२६ जानेवारी Republic Day ला पुण्यात राष्ट्रध्वज कोण फडकवणार?

74
२६ जानेवारी Republic Day ला पुण्यात राष्ट्रध्वज कोण फडकवणार?
  • खास प्रतिनिधी 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील लाखाच्या वर मताधिक्य घेत दणक्यात निवडून आले. पण यामुळे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या वादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Republic Day)

(हेही वाचा – Army Aviation Training School : अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरमुळे वाढेल सैन्य दलाची ताकद – ले. जनरल नांबियार)

…आणि सुटकेचा निश्वास टाकला

बारामतीतून अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शप) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांनी राजकारणात अगदी नवखा चेहेरा, अजित पवार यांचे पुतणे, युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी दिली. काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटात धास्ती होती की युगेंद्र यांनी अजित पवार यांचा पराभव केल्यास एकूणच पक्षाला त्याचा फटका बसेल. मात्र, अजित पवार यांनी लढत देत १ लाख ८९९ मताधिक्क्याने विजय मिळवला आणि सुटकेचा निश्वास टाकला. (Republic Day)

(हेही वाचा – Cyber ​​Crime : ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ट्रेडिंग’ सायबर फसवणुकीचे केंद्रबिंदू दुबई व्हाया चीन)

अजितदादांपेक्षा चंद्रकांतदादा मताधिक्क्यात वरचढ

पुण्याच्या कोथरूडमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही बाजी मारत शिवसेना उबाठाचे चंद्रकांत मोकाटे यांचा १.१२ लाख मताधिक्क्याने पराभव केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात या दोन्ही लखपती विजयाची चर्चा आहे. (Republic Day)

(हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात बदलणार खातेवाटपाचा फॉर्म्युला!)

पुण्यातून सोलापूरला

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना-भाजपाची सत्ता आली. तेव्हा पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर आली. वर्षभरात अजित पवार यांनी बंड केले आणि सरकारमध्ये सामील झाले.

सरकारमध्ये येताच त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आणि त्यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला. त्यामुळे पाटील यांना पुणे सोडून सोलापूरला धडण्यात आले. त्यावेळी राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनी अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले होते. (Republic Day)

त्यामुळे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री म्हणून कुठले दादा ध्वजारोहण करणार अजितदादा की चंद्रकांतदादा, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.