मुंबई प्रतिनिधी:
राज्यातील महायुती सरकारला जनते कडून मोठे समर्थन मिळाल्यानंतर, आता शिवसेना उबाठा पक्षासाठी विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू करत आहेत. (Shiv Sena UBT)
विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचा दावा
राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) अद्याप रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते नेमले गेले नाहीत. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) ठाकरे गटाकडून यासाठी जोरदार दावा होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षात सर्वाधिक संख्या उबाठाकडे असल्याने त्यांनाच हे पद मिळण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Water Shortage : पूर्व उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये शुक्रवारसह शनिवारीही पाणी संकट)
यासाठी आदित्य ठाकरे, सुनील प्रभू आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला आहे, असे माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या युवराजाला संधी देतात की एखाद्या अनुभवी नेत्याला विरोधी पक्षनेतेपदी बसवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरेंची कोंडी फोडण्याची रणनीती
शिवसेनेने (Shiv Sena) आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ हाती घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना उबाठाकडे गळती रोखण्यासाठी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत गटबंदी रोखण्यासाठी काय भूमिका घ्यावी, अधिवेशनात सरकारला कशा पद्धतीने घेरायचे, महिला सुरक्षेच्या (Women’s safety) मुद्द्यावर सरकारवर आक्रमक होण्याची रणनीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उद्धव ठाकरेंकडे विरोधी पक्ष नेते निवडण्याचा पूर्ण अधिकार
या बैठकीत सर्व आमदारांनी एकमुखाने विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले. त्यामुळे शुक्रवारी शिवसेना उबाठाकडून विधानसभाध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिकृत पत्र देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Mill Worker News : गिरणी कामगारांची फसवणूक; आझाद मैदानात संताप मोर्चाचा इशारा)
बैठकीला कोणते आमदार गैरहजर?
या महत्त्वाच्या बैठकीला विधानसभा आमदार दिलीप सोपल आणि राहुल पाटील हे वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, इतर सर्व आमदार व महत्त्वाचे नेते बैठकीला हजर होते.
विरोधी पक्षनेते पदावर कोण विराजमान होणार? तीन प्रमुख नावे चर्चेत
आदित्य ठाकरे – युवा नेतृत्व, ठाकरे घराण्याचा वारस
सुनील प्रभू – पक्षातील मजबूत आणि अनुभवी नेता
भास्कर जाधव – चांगले वक्तृत्व कौशल्य आणि विधानसभा अनुभव
(हेही वाचा – पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्रिपदासाठी चढाओढ असेल; Uday Samant यांनी व्यक्त केला विश्वास)
दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाला संख्या बळाच्या जोरावर विरोधी पक्षनेते पद मिळवण्याची शक्यता जास्त आहे. आता उद्धव ठाकरे स्वतःच्या घराण्यातील वारसाला संधी देतात की अनुभवी शिलेदारावर विश्वास टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community