‘Badlapur घटनेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची काय गरज?’; Sanjay Raut यांचा सवाल

114
‘Badlapur घटनेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची काय गरज?’; Sanjay Raut यांचा सवाल
‘Badlapur घटनेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची काय गरज?’; Sanjay Raut यांचा सवाल

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात उद्रेक झाला त्यानंतर राज्य शासनाचा प्रतिनिधि म्हणून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) जमावाला सामोरे गेले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाजन यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, असा सवाल करत “उबाठाचे कारेकर्ते बदलापूरला आंदोलन करायला जातील,” असे आज बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात उबाठा राजकारण करीत असल्याचेच दिसून येत आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली त्याची काय गरज आहे? असा उफराटा सवालही राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Badlapur)

(हेही वाचा- Yuvraj Singh Biopic : युवराजवर ‘सिक्सर किंग’ या बायोपिकची घोषणा, कोण करणार युवराजची भूमिका?)

राऊत पुढे म्हणाले महाविकास आघाडी म्हणून अजून महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल यासाठी शिवसेना उबाठा, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट एकत्र बसून विचारविनिमय करू. “गिरीश महाजन यांचं डोकं फिरले आहे,” असा आरोप करत राऊत म्हणाले, “गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस हे बलात्काराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्नाच्या प्रचाराला जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्तक आहेत. तसेच फडणवीस-महाजन यांची तीच मानसिकता आहे,” असा आरोपही केला. (Badlapur)

राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राऊत म्हणाले, “ लाडकी बहीण योजनादेखील बोगस आहे, नौटंकी आहे,” असा आरोपही त्यांनी केला. (Badlapur)

(हेही वाचा- Badlapur School Case : आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)

दरम्यान, फडणवीस यांच्यावर टीका करीत असताना, “फडणवीस यांनी बदलापूरच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली, त्याची काय गरज आहे. पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपी पकडला आहे. एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही,” असे विचित्र वक्तव्य राऊत यांनी केले. (Badlapur)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.