भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले…

109
भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले...
भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २० नोव्हें. रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit polls) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल्सने महायुतीला (Mahayuti) जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण सोईसुविधांअभावी मतदानाला मुकले!)

यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “एक्झिट पोलचा अंदाज राहू द्या. महाराष्ट्रातील जनता महायुतीसोबत आहे, हा मला विश्वास आहे. मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना, आमच्या सरकारने आणलेल्या व्यक्तीगत लाभाच्या योजना, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफी, डबल इंजिन सरकार यावं ही जनमानसाची भावना आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा-Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?)

वाढलेल्या मतदान टक्केवारीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “मला मतदानाचा वाढलेला टक्का आमच्याबाजूने दिसतोय. उत्साहाने मतदार बाहेर निघतो, तेव्हा तो सरकारच्या बाजूने, चांगल्या कामाच्या बाजूने मतदान करतो. लाडक्या बहिणींनी खूप मतदान केलं. शेतकऱ्यांनी मतदान केलं. बाकी वर्ग आहे, ज्यांना वाटतं डबल इंजिन सरकार यावं, त्यांनी मतदान केलय. राज्यात मविआ सरकार आलं, तर केंद्रातल्या योजना बंद पाडतील म्हणून महायुतीला मतदान केलं. शहरातला वर्ग, ग्रामीण वर्ग आमच्याबाजूने आहे.”

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा…”, एक्झिट पोलच्या अंदाजांवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?)

“लोकसभेला काँग्रेसने खोटारडेपणा केला, लोकांशी खोटं बोलून काँग्रेसने मतं घेतली, त्यांना धडा शिकवला पाहिजे, महिलांनी खूप मतदान केलं. टक्केवारी सांगता येणार नाही. मतदान खूप झालेलं आहे. आमचा चांगला विजय होईल, अपेक्षित नसेल इतका मोठा विजय मिळेल.” असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा-शिंदे, फडणवीस, पवार की ठाकरे… Maharashtra चा मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला?)

भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय, यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ला वाटत अंदाजित आकडा आम्ही पार करु. आमचे सध्या 105 आमदार आहेत, त्यापेक्षा जास्त जागा जिंकू. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा परफॉर्मन्स चांगला राहील. तिघांच्या मिळून बहुमतापेक्षा जास्त जागा येतील. अपक्षांची गरज भासली नाही, तरी त्यांना सोबत घेऊ. अपक्ष मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी सरकारसोबत असतात.” असं बावनकुळे म्हणाले आहेत. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.