Wakf Board चा तमिळनाडूतील दीड हजार वर्षे जुन्या हिंदू मंदिरावरच मालकीचा दावा; चर्चेला उधाण

Wakf Board चे म्हणणे आहे की, सरकारने वर्ष १९५४ च्या सर्वेक्षणानुसार त्यांना ही जमीन दिली आहे. हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जथलाना गावातील गुरुद्वाराची भूमी वक्फला हस्तांतरित करण्यात आली आहे.

173
केंद्र सरकार सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ बोर्डाच्या (Wakf Board) अधिकारांवर निर्बंध आणण्याच्या संबंधी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून कोणत्याही जमिनीवर मालकीहक्क सांगण्याच्या वक्फ बोर्डाच्या या मनमानी कारभारावर आळा बसणार आहे. कारण वक्फकडून अशा प्रकारे जमिनी बळकावण्याचा अनेक प्रकरणे घडलेली आहेत. यापैकी एक प्रकरण तमिळनाडूतील आहे. जिथे वक्फ बोर्डाने चक्क एका गावावरच दावा केला आहे.

काय आहे हे प्रकरण? 

तमिळनाडूच्या तिरुची जिल्ह्यातील तिरुचेंथुराई गावात वक्फ बोर्डाने (Wakf Board) १ हजार ५०० वर्षे प्राचीन मानेंदियावल्ली चंद्रशेखर स्वामी मंदिराच्या जागेवरच मालकीचा दावा केला. मंदिराची या परिसरात ३६९ एकर जमीन आहे. इस्लामचा उदयच १ हजार ४०० वर्षांपूर्वी झाला आहे. या दाव्यामुळे शेतकरी आणि इतर ग्रामस्थही आश्‍चर्यचकित झाले. गावातील एक शेतकरी राजगोपाल यांच्या म्हणण्यानुसार निबंधकांनी त्यांना सांगितले की, तमिळनाडू वक्फ बोर्डाने (Wakf Board) विक्री करार (सेल डीड्स) विभागाला २५० पानांचे पत्र पाठवले आहे, ज्यात म्हटले आहे की, तिरुचेंदुराई गावातील भूमीविषयीचा व्यवहार बोर्डाच्या ना हरकत प्रमाणपत्रानेच केला जावा. याखेरीज वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील १८ गावांच्या जमिनीवर त्याचा दावा ठोकला आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, सरकारने वर्ष १९५४ च्या सर्वेक्षणानुसार त्यांना ही जमीन दिली आहे. हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जथलाना गावातील गुरुद्वाराची भूमी वक्फला हस्तांतरित करण्यात आली आहे.
गुजरातमधील सुरत महानगरपालिकेचे मुख्यालय वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले होते. शाहजहान बादशाहाने ही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून त्याच्या मुलीला दान केल्याचा दावा बोर्डाने केला होता. सुन्नी वक्फ बोर्डाने (Wakf Board) चक्क ताजमहालवर दावा केला होता. तसेच ही सुन्नी वक्फची मालमत्ता म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शाहजहानकडून स्वाक्षरी केलेली कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.