शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर

239
शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर
शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे शरद पवार गटाकडून राजकारण चालू आहे. ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी मारकडवाडी येथे मतपत्रिकांवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच विशेष अधिवेशनात मारकडवाडीचा मुद्दा गाजला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) या ठिकाणी दाखल झाले होते. ईव्हीएमविरोधात गावकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ते आले. यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी X पोस्टद्वारे शरद पवार यांना आकडेवारीच पुढे केली आहे.

(हेही वाचा – ‘नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार’; Devendra Fadnavis असं का म्हणाले ?)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारकडवाडी येथे आतापर्यंत विविध पक्षांना मिळालेल्या मताधिक्याची आकडेवारी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे. जरा डोळे उघडून नीट वाचा. (maharashtra assembly election 2024)

२०१४ मध्ये काय झाले ?

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली, तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.

२०१९ मध्ये उत्तम जानकरांना मताधिक्य

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली.

२०२४ च्या विधानसभेला मारकडवाडीची भाजपाला साथ

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं, तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली.

या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही.

या वेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.