Vote Jihad : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीतही ‘व्होट जिहाद’, हिंदू मात्र अजूनही संभ्रमावस्थेत

261
Vote Jihad : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीतही 'व्होट जिहाद', हिंदू मात्र अजूनही संभ्रमावस्थेत
Vote Jihad : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीतही 'व्होट जिहाद', हिंदू मात्र अजूनही संभ्रमावस्थेत

मुस्लिम मतदार नेहमी भाजपा विरोधी शक्तींना समर्थन देत असतात. कारण भाजपाला सत्तास्थानापासून दूर ठेवणे हेच यामागील त्यांचे लक्ष्य असते. लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीच्या यशामागे हेच कारण असल्याचं राजकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळात असा दावा केला जातो की, मुस्लिम मतदारांकडून मतदारसंघनिहाय भाजपा उमेदवारांना हरवण्यासाठी एकगठ्ठा मतदान भाजपा विरोधी शक्तींना केले. हे स्पष्टीकरण अगदीच चुकीचे आहे असे नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणुक. (Vote Jihad)

( हेही वाचा : दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर

हरियाणा विधानसभा मतदारसंघात ९० पैकी चार विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुसंख्य मतदारांनी वेढलेले आहेत. तिथे हिंदू अल्पसंख्याक असून या चार जागांवर काँग्रेसला एकतर्फी विजय मिळाला. यातील फिरोजपुर झिरका विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मुस्लिम, १४ टक्के हिंदू असून काँग्रेसला विधानसभानिहाय मतदानाच्या ७२ टक्के मते मिळाली. इथे भाजपला फक्त १७. ५ टक्के मते मिळाली आहेत. दुसरीकडे हरियाणाच्या लोहारु विधानसभा मतदारसंघात ९९.४ टक्के हिंदू मतदार आणि ०.४ टक्के मुस्लिम मतदार आहेत. मात्र हिंदूंच्या मतविभाजनामुळे मतांचे धुव्रीकरण झाले आणि काँग्रेस पक्ष फक्त ७९२ मतांनी इथे विजयी (Vote Jihad) झाली. तिथे हिंदूंची मते वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभाजीत झाली.ज्यांचा फायदा काँग्रेसला अधिक झाला. मात्र दुसरीकडे धर्माच्या नावाखाली मुस्लिम एकगठ्ठा मतदान करताना आढळतात. हरियाणाच्या पुन्हाना विधानसभेत ८८ टक्के मुस्लिम आणि नूंह विधानसभेत ७७ टक्के मुस्लिम असून तिथे काँग्रेसने ५० टक्क्यांहून अधिक मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.

पुन्हा विधानसभेत भाजपा मोहम्मद इजाज खान यांना उमेदवारी दिली. मात्र भाजप उमेदवार मोहम्मद खान मुस्लिम असूनही त्यांना १ लाख ४६ हजार मतांपैकी फक्त पाच हजार म्हणजे ३ टक्के मते मिळाली. त्यांचे डिपॉजिटही जप्त झाले. त्याचवेळी काँग्रेसला याच जागेवर ६० टक्के मते मिळाली. हे फक्त हरियाणापुरते मर्यादीत नाही तर जम्मू काश्मीरमधील जम्मू विभागात ६२.६ टक्के हिंदू आणि ३३.५ मुस्लिम आहेत. मात्र भाजपाला हिंदूबहुल जम्मूमध्ये ४३ पैकी २९ जागांवर विजय मिळाला. याच हिंदूबहुल जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरेन्सला ७ जागांवर आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळाला आहे. (Vote Jihad)

याउलट काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या ९६.४ टक्के असून हिंदूंची लोकसंख्या २.५ टक्के आहे. तिथे एकाही जागेवर भाजपाला विजय मिळवता आला नाही. भाजपाने काश्मीर खोऱ्यात ४७ पैकी १९ जागांवर निवडणूक लढवली. त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाला काश्मीरमध्ये ३९ पैकी ३५ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसने ९ पैकी ५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मुस्लिम समाजात कुणाला मतदान करायचे हे आधीच ठरलेले आहे. तर हिंदू जातीजातीमध्ये विभागले गेले असल्याने आजही संभ्रमावस्थेत आहेत. मात्र मुस्लिम समाजात स्पष्टता असून मुस्लिम लोक धर्माच्या आधारावर मतदान करतात आणि विरोधी पक्षही मुस्लिम समाज धोक्यात असल्याचे सांगून त्यांना धर्माच्या नावावर एकजूट करण्याचा प्रयत्न करतात.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.