Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप

154
Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप
Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप

विधानसभेची (Vidhansabha Election 2024) आचारसंहीता लागू झाल्याने रेशन दुकानातुन आनंदाचा शिधा मिळणार का असा संभ्रम नागरीकांमध्ये होता. मात्र आंनदाच्या शिधाची पिशवी वगळून शिधामधील संपुर्ण रेशन कार्ड धारकांना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे. दोन महीन्यात ५ लाख २७ हजार ३४२ लाभार्थ्यांपैकी ३ लाख १७ हजार ७४३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. तर उवर्रीत २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना किट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. (Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Salman Khan : सलमान खानला पुन्हा धमकी! थेट मुंबई पोलिसांना मेसेज करुन केली ‘ही’ मोठी मागणी)

सणासुदीत रेशनकार्ड धारकांना शासनाकडून केवळ शंभर रूपयात आनंदाचा शिधा दिला जाते. यामध्ये १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो, रवा व १ किलो हरभरा डाळीचा समावेश आहे. गणेश चतुर्थी निमित्त नागरीकांना या आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात गणेश उत्सव झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या उत्सवाचा शिधा वाटप सुरू असतानाच मंगळवारी विधानसभेची आचारसंहीता लागु झाली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केल्या जातो. त्यामुळे विधानससभेच्या निवडणुकीची आचारसंहीता सुरू असल्याने हा शिधा वाटप होईल का असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला होता. (Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-आचारसंहितेत घेतलेले निर्णय प्रलंबित ठेवावे; Election Commission ने बजावलं)

परंतु यावर पर्याय काढत त्या राजकीय पिशवीविनाच कार्डधारकांना शिधामधील साहित्य देण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाकडुन देण्यात आले आहे. तसे वाटप देखील सद्या सुरू आहे. जिल्ह्यात ५ लाख २७ हजार ३४२ आनंदाचा शिधाचे लाभार्थी असुन सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महीन्यात ३ लाख १७ हजार ७४३ शिधाचे वाटप करण्यात आले आहे. प्रतिक्षेत असलेल्या २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना या किटचे वाटप त्या राजकीय पिशवीविना सुरू आहे. (Vidhansabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.