Assembly Election Results 2024 : वंचितचा फटका कुणाला?

109
Assembly Election Results 2024 : वंचितचा फटका कुणाला?
Assembly Election Results 2024 : वंचितचा फटका कुणाला?

विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे (Vanchit Bahujan Aaghadi) महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुक आयोगाच्या निकालाच्या आकडेवारीनुसार, वंचितमुळे मविआतील राष्ट्रवादी (श.प)चे ८, काँग्रेसचे ६ आणि शिवसेनेचे ६ आणि एमयएमचे दोन उमेदवारांचा दारूण पराभव झाला. (Assembly Election Results 2024)

( हेही पाहा : Election : राज्यात पुढच्या महिन्यातच पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजणार, सहा जागांसाठी होणार निवडणूक ?

दरम्यान विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना प्रभावी ठरलेली असताना ही वंचितला (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभेत मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यात यश आले आहे. वंचितने विधानसभेच्या २०० जागा लढवल्या होत्या. त्यातील १९४ जणांची अनामत रक्कम जप्त झाली असून एक उमेदवार दुसऱ्या तर ५८ मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. वंचितला (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा निवडणुकीत १५ लाख ८२ हजार (३.६ टक्के) मते मिळाली होती. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत वंचितला एकूण १४ लाख २२ हजार (३.१ टक्के) मते मिळाली आहेत. वंचितने विधानसभेत अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभे केले होते. ज्यामुळे एमआयएमच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यातही वंचितने विधानसभेत ‘बौद्ध- मुस्लिम- ओबीसी’ हे समीकरण वापरले होते. (Assembly Election Results 2024)

वंचितच्या उमेदवारांमुळे मविआचे उमेदवार सत्तेपासून दूर

वंचितमुळे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक (Sandeep Naik), सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोटे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा निसटता पराभव झाला. काँग्रेसचे वसंत पुरके, दिलीप सानंद, धीरज देशमुख या नेत्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. त्याशिवाय वंचितच्या उमेदवारामुळे भाजपाचे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांचा कमी मताधिक्य मिळवत विजय झाला. (Assembly Election Results 2024)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.