Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांचा अर्थसंकल्प सादर ; काय स्वस्त, काय महाग?

215
Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांचा अर्थसंकल्प सादर ; काय स्वस्त, काय महाग?
Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांचा अर्थसंकल्प सादर ; काय स्वस्त, काय महाग?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर केले. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. निर्मला सीतारमण यांनी (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला.

हेही वाचा-Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त

पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) वाहनांच्या तुलनेत महागडी असणारी ईलेक्ट्रीक वाहने (Electric vehicles) स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक वाहनांमधील महागडी असलेली बॅटरीच स्वस्त करण्यात येत आहे. इलेक्ट्रीक वाहनांमध्ये लिथिअम आयन बॅटरी वापरली जाते. बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते. सीतारामण यांनी या बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. कोबाल्ट हा महागडा पदार्थ देखील स्वस्त केला जाणार आहे. यामुळे लिथिअम आयनच्या बॅटरीची किंमतही कमी होणार आहे. (Union Budget 2025)

हेही वाचा-Union Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर

या घोषणेमुळे केवळ इलेक्ट्रीक वाहनेच नाही तर मोबाईलही स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा नव्याने ईव्ही घेणाऱ्यांना होणार आहे. तसेच ज्या लोकांनी ईव्ही घेतल्या आहेत, त्यांची बॅटरी खराब झाली तरीही त्यांना नवी बॅटरी बदलताना याचा फायदा मिळणार आहे. (Union Budget 2025)

हेही वाचा-Budget 2025 : नव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त होणार ? आर्थिक सर्वेक्षण अहवाल काय सांगतो ?

अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे. (Union Budget 2025)

काय महाग?
इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. (Union Budget 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.