Uddhav Thackeray: “खरा गद्दार तर…” राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

232
Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray: "खरा गद्दार तर..." राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

शिवडीमधील जाहीर सभेत बोलताना मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे. तसेच उद्धव ठाकरे खाष्ट सासू असल्याचे देखील राज ठाकरेंनी म्हटले. यावर आता वांद्रे पूर्वमधील उमेदवार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या प्रचारार्थ बोलताना उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत ४ दिवस ड्राय डे; अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क व पोलिसांची नजर)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “एक पक्ष आहे कोणता तरी, पहिले झेंडा वेगळा होता आणि आता झेंडा बदलला आहे. त्यानंतर इंजिन इकडे तिकडे झाले. पहिले मनसे होतं आता गुनसे आहे. गुजरात नवनिर्माण सेना. जो महाराष्ट्राचा घात करेल, त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलं आहे. काही ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काहीही वाटेल ते बोलायचं. आजही काहीतरी बोललेत.” असा पलटवार उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.

(हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला; केंद्र सरकार ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवणार)

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, खरंच बहिणी लाडक्या असतील तर किमान माझ्या महिलांना रेल्वे प्रवास मोफत करुन दाखवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे प्रचाराला जेव्हा फिरत होते, तेव्हा मणिपूरमध्ये अत्याचार सुरु होते. गेल्यावेळी मतांमध्ये विभागणी झाली. ते यावेळी करु नका. तुमच्या आणि तुमच्या भावी पीढीला अंधारात घ्यायचं असेल तर महाझुठीला मत द्या. भविष्य प्रकाशित करायचं असेल तर मशालीला मतदान करा.” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.