Rahul Shewale बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड

180
Rahul Shewale बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड

माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या बदनामीच्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच, ही रक्कम शेवाळे यांना दहा दिवसांत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Rahul Shewale)

दरम्यान या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करावे, अर्ज करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याची विनंती दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र, त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Rahul Shewale)

(हेही वाचा – Aadhar Card मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

काय आहे प्रकरण ?

शेवाळे (Rahul Shewale) यांनी आपल्या विरोधात लेख प्रसिद्ध केल्याबद्दल बदनामीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारी संदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही दरम्यान, दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला होता. नियमानुसार दोघांनीही दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीने आव्हान द्यायला हवे होते, ते त्यांनी केले नाही. नियमांनुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून ८४ दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे दोघांनीही विलंब माफ करण्यासाठी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही हा दंड ठोठावला असून दहा दिवसांच्या आत हे पैसे शेवाळे यांना देण्याचे आदेश दिले. (Rahul Shewale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.