आता Uddhav Thackeray निघाले बाबा आढावांच्या मागे

114
आता Uddhav Thackeray निघाले बाबा आढावांच्या मागे
  • प्रतिनिधी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमविरुद्ध हा आत्मक्लेशाचा एल्गार आहे. बाबा आढाव यांचे वय ९५ वर्षे आहे. बाबांची सारी हयात वंचित, कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात गेली आहे. त्यांच्या आंदोलनाचा शनिवारी तिसरा दिवस आहे. या आत्मक्लेष आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे पुण्यात भेट घेणार आहेत.

(हेही वाचा – Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळामुळे पळणार थंडी! ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी)

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आत्मकलेश आंदोलनाला शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भेट दिली होती. याच आंदोलनाला अजित पवार देखील भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ बाबा आढाव यांचं तिसऱ्या दिवशी पुण्यातील फुलेवाड्यात आत्माकलेष उपोषण सुरू आहे. तिथे जात शरद पवारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Eknath Shinde : अजित पवारांनी बिघडवले शिंदेंचे गणित)

अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? ९५ वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना ९५ वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला असल्याचे उबाठाने म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि…)

शरद पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं – चंद्रशेखर बावनकुळे

आपल्याच पक्षातील लोक पुन्हा पक्ष सोडून जातील म्हणून शरद पवार ईव्हीएम वर बोलत आहेत. याआधी २०१७ ला ईव्हीएमला दोष देऊ नका अशा प्रकारचे वक्तव्य देखील पवारांनी केले असल्याचा पुनरुच्चार करत शरद पवार जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असते असा उपरोधिक टोला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.