Uddhav Thackeray यांनी नितेश राणेंचा उल्लेख केला भस्मासूर

93
Uddhav Thackeray यांनी नितेश राणेंचा उल्लेख केला भस्मासूर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

कणकवली विधानसभेत विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेला उमेदवार मिळत नसल्याने अखेर संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात असले तरी, प्रत्यक्षात येथील येथील भस्मासुराला गाडायला सतीश सावंत, अतुल, सुशांत ही मंडळी तयार होती, असे सांगत उबाठा शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नितेश राणे यांचा उल्लेख भस्मासूर असा केला. संदेश पारकर यांच्यासह इतर तिन्ही इच्छुक उमेदवारांना व्यासपीठावर उभे करून यासर्वांची जबाबदारी मी घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Congress नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य; डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते पण…)

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेनेचे संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेच्या पराभवाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या पराभवाचा वचपा विधानसभेच्या निवडणुकीतून काढा, असेच आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख न करता कोण तरी मला आव्हान देत आहे. इकडून तिकडून आलेले मला आव्हान देत आहे, काय म्हणतात तर रस्त्याने येवन तर बघा म्हणून, हेलिकॉफ्टरमधून येवू नका. अहो, रस्त्याने यायला आधी रस्ते तरी निट बनवा. गोवा महामार्ग अधर्वटच आहे, गगनबावडा मार्गही बरोबरच नाही. त्यामुळे आधी रस्ते तरी निट करा मग आम्ही नक्कीच याच रस्त्याने येऊ आणि जावू असे ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.