Uddhav Thackeray यांची पंतप्रधान मोदींवर बोलण्याची लायकी नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

82

महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने पंतप्रधान मोदींना संपवलं असतं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना उद्देशून बोललं होतं. उद्धव (Uddhav Thackeray) तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून 3 लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने 3 लाख घेतले होते. आदित्य ठाकरेने 15 टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री?, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी केला.

रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधाच जोडे मारो आंदोलन केले. त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिले. नारायण राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला तो माझ्या मतदारसंघात आहे म्हणून मी सोमवारी, पत्रकार परिषद घेतली. तो पुतळा पडला हे दुर्दैवी. पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे बोलतो, कोण आहेस तू?

(हेही वाचा Congress मध्ये संधी देण्यासाठी केले जाते लैंगिक शोषण; काँग्रेसच्या महिला नेत्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकरणात खळबळ )

शरद पवार लावीलावी करतात  

नारायण राणे म्हणाले की, आजही शरद पवार जाती-जातीमध्ये लावालावी करत आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. 83 वय झालं तरी स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. पवारांनी शांततेचा संदेश दिला पाहिजे, पण ते काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात. पवार सत्तेत येणार म्हणतात, पण अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार का?

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.