Uddhav Thackeray यांना भीती स्वत:चेच आमदार कमी निवडून येण्याची…

150
UBT Shiv Sena ला उभे होण्यापूर्वीच पाडले, ताकदच संपवली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने!

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडलेल्या सभेत मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो असे जाहीर केले. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही याची कल्पना असल्याने ठाकरेंनी ही गुगली टाकली असली तरी प्रत्यक्षात ठाकरेंना आपल्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येणार नाही याची पूर्ण खात्री असल्यानेच त्यांनी खुल्या व्यासपीठावर स्वत:चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्याचे बोलले जात आहे.

स्वत: मुख्यमंत्री बनणे हेच स्वप्न

महाविकास आघाडीमध्ये ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा गणित ठरलेले असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीसंदर्भातील मुंबईतील महाविकास आघाडीच्या जाहीर मेळाव्यात बोलतांना, इथे पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो असे आवाहन केले. ठाकरे म्हणाले, मी माझ्यासाठी लढत नाही. मी माझ्या स्वार्थासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपद सोडले, असे सांगितले. परंतु ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षाची वाटचाल अधिक चांगली करणे किंवा पक्ष वाढवणे हे नसून त्यांना स्वत: मुख्यमंत्री बनणे हेच स्वप्न आहे, हे स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा – MHADA : पहाडी गोरेगावातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, तर हे वाचाच…!)

स्वत:चे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे रेटण्याचा प्रयत्न

युतीमध्ये असताना ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सुत्र ठरलेले असतानाही ठाकरेंनी भाजपाला दगा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपाला बाजूला करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असे आवाहन करत स्वत:चे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेहरा जाहीर होणारी नाही याची पूर्ण कल्पना

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाचे आमदार कमी निवडून येतील याची भीती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आपला चेहरा जाहीर करून घेत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही याची पूर्ण कल्पना असल्यानेच त्यांनी हे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – Mukhyamantri ladki Bahin Yojana: महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – फडणवीस)

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे ही प्राथमिकता नाही…

मात्र, यावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे ही पहिली प्राथमिकता नसून आम्ही निवडणुकीची तयारीला लागला आहे. जागा वाटप आणि त्यानंतर आमदार निवडून आणून सरकार स्थापन करणे ही पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष न नाना पटोल यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील, असे सांगत दिल्लीश्वर हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पेक्षा वरिष्ठ असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव यांनी स्वत:ऐवजी पक्षातील इतर नेत्याचा चेहरा जाहीर करावा…

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वत:ऐवजी पक्षातील इतर नेत्याचा चेहरा जाहीर करावा, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही चेहरा जाहीर केला जाईल. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर त्यांना कुणी विरोध करणार नाही, पण इतर चेहऱ्यांना कसा विरोध होतो, हे नाव जाहीर केल्यानंतर कळेल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केवळ मुख्यमंत्री बनायचे असून त्यामुळेच ते आघाडीसोबत आहेत, आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार पाडण्याचा प्रयत्नही करतील अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.