Uddhav Thackeray: ठाकरेंना दणका मिळणार? उबाठाचा आमदार भाजपच्या वाटेवर, चर्चांना उधाण

224
Uddhav Thackeray: ठाकरेंना दणका मिळणार? उबाठाचा आमदार भाजपच्या वाटेवर, चर्चांना उधाण
Uddhav Thackeray: ठाकरेंना दणका मिळणार? उबाठाचा आमदार भाजपच्या वाटेवर, चर्चांना उधाण

आगामी विधानसभा निवडमुकांच्या तोंडावर उबाठा गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला ठाकरे गटाचा आमदार विमानतळावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(हेही वाचा –एक्सप्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे Central Railway ची वाहतूक विस्कळीत)

ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत (Uday Singh Rajput) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. त्यामुळे उदय सिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा –Shri Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीती हा पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. संध्या दोशी पश्चिम उपनगरातील ठाकरे गटाचा महत्वाचा चेहरा होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातो. संध्या दोशी या मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 मधून तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.