उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जातायेत; Sanjay Shirsat यांचा हल्लाबोल

कधीकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागावाटपाच्या चर्चेसाठी येत होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. 

143

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाविषयी चर्चा सुरु झाली आहे. अशातच दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांना लक्ष्य करू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीत जात आहेत, ते दिल्लीचे पायपुसणे बनले आहेत, अशी टीका करणाऱ्या उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी थेट हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जात आहेत, अशी टीका केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. विशेषतः या दौऱ्यात ते विधानसभेच्या जागावाटपावही काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीही बोर्डावर आली आहे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला फार महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांच्या या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा Bangladesh Protests : Sheikh Hasina बांगलादेश सोडून भारतात आल्यावर Kangana Ranaut काय म्हणाल्या?)

उद्धव ठाकरे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणत होते. पण आता तेच दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जात आहेत. या प्रकरणी संजय राऊत हे वाढप्याच्या भूमिकेत आहेत. ते कुणाला लोणचे द्यायचे, कुणाला पाणी भरून द्यायचे हे पाहतात. कधीकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागावाटपाच्या चर्चेसाठी येत होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

मराठा आरक्षणावर शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन दाखवले. लोकसभा निवडणुकीत लागलेली ठेच लक्षात घेता आम्ही आमच्या जागा घेऊच, पण यावेळी उमेदवार निश्चितीमध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही. शिवसेनेचा निर्णय शिवसेनाच घेईल, असे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना ठणकावून सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.