हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासल्यावर Uddhav Thackeray संतापले 

270

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची सोमवारी वणी येथे सभा होत आहे. या सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संतापल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटले काय करायचे आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा हिंदू आणि शीखांना Halal प्रमाणित जेवण न देण्याचा एअर इंडियाचा निर्णय)

मी यंत्रणेला सांगत आहे की मी अजिबार रागावलो नाही. तुम्ही तुमच काम करताय, मी माझ काम करतोय. मी यंत्रणेला सांगतो, तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? तपासायला हवी की नको? दाढीवाल्या शिंदेंची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटवाल्यांची तपासायला हवी की नको? फडणवीसांची बॅग तपासायला हवी की नको? पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभेसाठी येतात. मोदी आल्यानंतर रस्ते बंद होतात. मग हे रस्त्याने सुसाट जातात. मात्र, पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार असोत. यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. मग मात्र, पोलिसांनी मधे यायचं नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी मधे यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसं प्रचाराला जो कोणी येईन त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना आहे”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.