Uddhav Thackeray यांनी स्वतःची तुलना केली Ratan Tata, श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्याशी!

413
Uddhav Thackeray यांनी स्वतःची तुलना केली Ratan Tata, श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्याशी!
Uddhav Thackeray यांनी स्वतःची तुलना केली Ratan Tata, श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्याशी!

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena UBT) यांनी दसरा मेळाव्याला संबोधित करताना स्वतःची तुलना दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata), महाभारतातील अर्जुन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांशी करून सहानुभूती मिळवण्याचा आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. (Uddhav Thackeray)

योग्य वाटेल तेच कर

शनिवारी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ठाकरे बोलत होते. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर एक आठवण सांगितली. ते म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर रतन टाटा घरी भेटायला आले आणि निघताना रतन टाटा यांनी सांगितले की तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. जेआरडी टाटा यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी सोपवली, तशी जबाबदारी तुझ्यावर शिवसेनाप्रमुखांनी सोपवली. जेआरडी यांचा माझ्यावर विश्वास होता तसा तुझ्यावर बाळसाहेबांचा विश्वास होता. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल तेच तू कर हेच शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित आहे, असा सल्ला रतन टाटा यांनी आपल्याला दिला, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. आणि लगेचच भाजपाची साथ का सोडली यावरून होणाऱ्या आरोपांवर सारवासारव केली. भाजपावर आरोप करत म्हणाले, “मी कुठेही बाळसाहेबांचे विचार सोडलेला नाही. मी भाजपाला लाथ घातली कारण त्यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, चूक की बरोबर?” असा प्रश्न उपस्थितांना केला आणि म्हणाले, “जा त्या मिंधे (एकनाथ शिंदे) यांना जाऊन सांगा की तुझा विचार हा बाळसाहेबांचा विचार नाही.” ठाकरे यांनी हिंदुत्व आणि भाजपाला सोडले त्यामुळे ५६ पैकी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेना पक्ष सोडून गेले, ही चूक मन्य न करता भाजपाला सोडण्याचा निर्णय कसा योग्य आहे, याचे स्पष्टीकरण दिले.

(हेही वाचा – RSS : रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलन रोखणाऱ्या मुसलमानांविरुद्ध गुन्हा दाखल)

अर्जुन-शिवाजी महाराजांशी तुलना

त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची तुलना महाभारतातील अर्जुन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीही केली. अर्जुनासमोर रणांगणात आप्तस्वकीय लोक होते आणि श्री कृष्णाने गीता सांगितली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगावरही आपलेच लोक आले होते, असे सांगून आपल्याविरोधात आपलेच लोक गेले, असे ठाकरे यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.