माहीम मतदारसंघात तिरंगी लढत; Sada Sarvankar निवडणूक लढवणार

150
बहुचर्चित असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात उबाठाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या १० मिनिटापर्यंत चित्र स्पष्ट होत नव्हते, सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर त्यांच्या शिवतीर्थ येथे चर्चेला गेले असता राज ठाकरे यांनी भेटण्यास नकार देत, तुम्हा निवडणूक लढायची तर लढा,  असे म्हटल्याचे सदा सरवणकर यांनी माध्यमांना सांगून आपण आता लढाई लढणार असल्याचे सांगितले.
सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याविषयी भाजपाकडून दबाव टाकण्यात आला होता, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सदा सरवणकर यांना विनंती केली होती. मात्र तरीही सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रसाद लाड यांनीही आम्ही अमित ठाकरे यांचा प्रचार करणार असे सांगितले होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळावा याच्या प्रतीक्षेत होते. अखेर  पुत्र समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी गेले असता त्यांना राज ठाकरे यांनी वेळ दिली नाही तसेच ‘तुम्हाला निवडणूक लढायची असेल तर लढा’ असे सांगितले. त्यामुळे सदा सरवणकर माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.