इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी होणार ? Bangladesh मध्ये सुरु आहेत हालचाली

86
इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी होणार ? Bangladesh मध्ये सुरु आहेत हालचाली
इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी होणार ? Bangladesh मध्ये सुरु आहेत हालचाली

कुराण आणि महंमद पैगंबर (Muhammad Paigambar) यांच्या विरोधात अनावश्यक, निर्लज्ज, हट्टी अन् चिथावणीखोर भाषणे करणे अशा कृतींसाठी फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप यांसारख्या शिक्षेची तरतूद असावी कि नाही ? यावर संसदेने विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही धर्माच्या लोकांना दुखावणारे किंवा त्यांच्यात भीती, आणि दहशत निर्माण करणार्‍या अशा कोणत्याही प्रक्षोभक भाषणाला किंवा अशा कृतींना आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणी बांगलादेश (Bangladesh) सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court of Bangladesh) बांगलादेश सरकारकडे केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘या’ जिल्ह्यात 160 पैकी 143 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त)

या द्वारे सर्वाेच्च न्यायालयाने इस्लाम किंवा पैगंबर यांचा अवमान केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी युनूस सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका मौलानाने सौदी अरेबियाच्या मशिदीप्रमाणे देशात मशिदी विकसित करणार असल्याचे सांगितले आहे. याद्वारे बांगलादेशाचे इस्लामीकरण केले जात आहे, अशी चर्चा येथील हिंदू करत आहेत.

महंमद युनूस (Muhammad Yunus) सरकारमधील खालिद हुसैन यांनी सौदी अरेबियाच्या मदिना मशिदीच्या धर्तीवर चितगावमध्ये (Chittagong) मशीद विकसित करण्याची घोषणा केली आहे. सरकार यासाठी १० कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.