घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला

136
घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला
  • मुंबई प्रतिनिधी

फेसबुक लाईव्ह करून घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगले काम करत असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा- PUNE : पुणे शहरात तब्बल ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (आर्टी ) उद्टघान आज शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, असा इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता दिला होता.  शिंदे यांनी आर्टीच्या कार्यक्रमात बोलताना या इशाऱ्याचा समाचार घेतला. (CM Eknath Shinde)

चांगल्या योजनांमुळे विरोधकांची पोटदुखी सुरु झाली असून आता फडणवीस यांना संपविण्याची भाषा केली जात आहे. सरकारने आणलेल्या योजनांचा घाव वर्मी लागला आहे. त्यामुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्हपासून सावध राहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या अगोदर जमा होतील. ही योजना निवडणुकीपर्यंत सुरु राहील असे सांगणाऱ्या या सावत्र भावांना माझ्या बहिणींनी लक्षात ठेवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा- Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana आता संकेतस्थळावरही अर्ज सादर करता येणार)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हलली आहे. सरकार या योजनांचा विचार गेले वर्षभर करत होते. तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वत्रंत्र मंत्रालय सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आदी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.