‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत…’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात

125
‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत...’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात
‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत...’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Vidhan Sabha election) दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणूकीसाठी येत्या २५ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कटरा येथील जनतेला संबोधित केलं. याच दरम्यान मोदींनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल करत त्यांना ‘व्हायरस’ (Rahul Gandhi virus) असं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे देवी-देवता ‘देव’ नाहीत… हिंदू धर्मात प्रत्येक गावात देवांची पूजा करण्याची परंपरा आहे.” (Narendra Modi)

जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस पक्षाच्या व्हायरसने परदेशात जाऊन काय म्हटलं ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. ते म्हणतात की, आमचे देवी-देवता देव नाहीत… हिंदू धर्मात प्रत्येक गावात देवांची पूजा करण्याची परंपरा आहे.” “आम्ही देव आहे हे मानणारे लोक आहोत आणि हे काँग्रेसचे (Congress) लोक म्हणतात की, देव नाही, हा आमच्या देवांचा अपमान नाही का? काही मतांसाठी काँग्रेस आमची श्रद्धा आणि आमची संस्कृती कधीही पणाला लावू शकते.” राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील विधानाचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसचे लोक चुकून अशा गोष्टी बोलत नाहीत, तर ही जाणीवपूर्वक केलेली कॉंग्रेसची चाल आहे.” असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Narendra Modi)

(हेही वाचा – Assembly Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं; ‘इतक्या’ जागांवर दावा)

‘‘कॉंग्रेस मोहब्बत की दुकान (Congress Mohabbat Ki Dukan) म्हणत द्वेषाचं सामान विकण्याची ही त्यांची जुनी नीती आहे. त्यांना व्होट बँकेशिवाय काहीही दिसत नाही. हे भारतातील भ्रष्टाचाराचे जन्मदाते आहेत” असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.  (Narendra Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.