BJP चा हा हरियाणा पॅटर्न नाही; तर…

153

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांपैकी भाजपाने (BJP) सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधी हरियाणा राज्यात निवडणूक झाली जिथे भाजपाचा पराभव होणार असे एक्झिट पोल आले होते, मात्र मतदारांनी हे पोल खोटे ठरवत भाजपाला (BJP)  सत्तेवर बसवले. त्यामुळे महाराष्ट्रातही हरियाणा पॅटर्न चालविला जाईल, अशी शक्यता होती, पण तसे झाले नाही.

भाजपाने (BJP) हरियाणामध्ये बहुतांश जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. म्हणून महाराष्ट्रातही भाजपा विद्यमान आमदारांना घरी बसवण्याची शक्यता होती.  पण भाजपाने महाराष्ट्रात तसे अजिबात केले नाही. अनेक विद्यमान आमदारांऐवजी नव्या उमेदवारांना संधी दिली जाईल, तसेच जे तीन वेळा आमदार झाले आहेत, त्यांना संधी नाकारली जाईल, असेही म्हटले जात होते. परंतु भाजपने हरियाणा पॅटर्न न राबवता महाराष्ट्र पॅटर्न तयार केला. यामध्ये पुन्हा जुन्या आमदारांवरच विश्वास व्यक्त केला. केवळ दहा ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहे.

भाजप आमदारांनी घेतला होता धसका

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) धक्का बसला. पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची जबाबदारी आमदारांवर टाकली जाणार असल्याची चर्चा होती. तसेच राज्यातील सामाजिक आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन तिकीट वाटप करण्यात येईल, असे म्हटले जात होते. यामुळे भाजपच्या यादीत चमत्कार घडेल, अनेक जणांना धक्का बसले, असे म्हटले जात होते. परंतु भाजपकडून तसे काही झाले नाही. यामुळे विद्यामान आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

(हेही वाचा मुंबई आणि महामुंबईत BJP च्या उमेदवार यादीत नवीन चेहऱ्यांना संधी नाही; विद्यमान आमदारांवरच विश्वास)

नवीन उमेदवार

  • प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
  • विनोद शेलार – मालाड पश्चिम
  • राजेश बकाने – देवळी
  • श्रीजया चव्हाण – भोकर
  • शंकर जगताप – चिंचवड
  • विनोद अग्रवाल  – गोंदिया
  • अनुराधा चव्हाण – फुलंबरी
  • सुलभा गायकवाड ( आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) – कल्याण पूर्व
  • राहुल आवाडे – इचलकरंजी
  • अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.