Pratap Sarnaik : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत नव्याने उभ्या राहणाऱ्या रहिवासी आणि व्यावसायिक इमारतीमध्ये EV चार्जिंग स्टेशन बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जर या इमारतीमध्ये EV चार्जिंग स्टेशन बसवले नाही तर इमारतींना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजेच NOC मिळणार नाही. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. (Pratap Sarnaik)
मिळलेल्या माहितीनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी देखील नवा नियम लागू करण्यात येणार आहे. अशा सोसायट्यांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी किमान 50 टक्के सभासदांची मान्यता आवश्यक राहणार आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : मेजर अनिल अर्स यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ पुरस्कार जाहीर)
तसेच नगरविकास विभाग विकास नियंत्रण नियमावलीत (DCR) यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे. यानुसार, बांधकाम व्यावसायिकांना इमारतीचे नियोजन EV चार्जिंग स्टेशनच्या सोयीसहच करावे लागणार आहे. अन्यथा अशा इमारतींना अधिकृत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नाकारण्यात येईल.
हेही पहा –