The Kerala Story : चित्रपटावर प. बंगालमध्ये बंदी; काय म्हणाले विवेक अग्निहोत्री, विपुल शाह? 

द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनीही ममता बॅनर्जी यांनी आमच्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊन लढू असा इशारा दिला. 

143
चित्रपटावर प. बंगालमध्ये बंदी
चित्रपटावर प. बंगालमध्ये बंदी

मुसलमानांकडून हिंदू मुलींचे होत असलेल्या धर्मांतराचा भांडाफोड करणाऱ्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला भारतभर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावत असलेल्या या चित्रपवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र मुस्लिमांच्या लांगूलचालनामुळे चित्रपटावर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोत्या विचारसरणीचा आता सगळीकडून निषेध होत आहे. द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली, तर चित्रपटाचे निर्माता विपुल शाह प. बंगाल सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

“द काश्मीर फाईल्स म्हणजे काय? हा चित्रपट एका विभागाचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे काय?… ही रंगवलेली कथा आहे, असे संगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी, माझ्याबद्दल बोलत आहेत, असा माझा अंदाज आहे. होय, मी बंगालमध्ये खिलाफतने भडकावलेल्या डायरेक्ट अॅक्शन डे नरसंहारातून वाचलेल्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो. तुम्ही का घाबरताय? ‘द काश्मीर’ फाइल्स हा नरसंहार आणि दहशतवादाबद्दलचा होता. काश्मिरी लोकांची बदनामी होते, असे तुम्हाला कशाच्या आधारावर वाटत आहे? एखाद्या राजकीय पक्षाकडून चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी दिला जातो, असे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता?मी तुमच्याविरुद्ध मानहानीचा खटला आणि नरसंहार नाकारण्याचा खटला का दाखल करू नये? तुम्ही ज्याबद्दल बोलताय त्या चित्रपटाला ‘द दिल्ली फाइल्स’ म्हणतात ‘बंगाल फाईल्स नाही’ आणि कोणीही मला गप्प करू शकत नाही, असे विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तर द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनीही ममता बॅनर्जी यांनी आमच्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊन लढू असा इशारा दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.