Bitcoin Scam प्रकरणातील ‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचाच; अजित पवारांनी केली पुष्टी

भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीचे काही पुरावे सादर केले.

159
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत आर्थिक व्यवहार करण्यासाठी Bitcoin Scam केल्याचा गंभीर आरोप पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केला. त्यासंबंधीचे फोन रेकॉर्डिंगही सोशल मीडियात व्हायरल होत असताना सुप्रिया सुळे यांनी मात्र ‘तो’ आवाज आपला नसल्याचा दावा केला. परंतु सुप्रिया सुळे यांचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ‘तो’ आवाज माझ्या बहिणीचाच असल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीचे काही पुरावे सादर केले. ज्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट यांचा समावेश आहे. यात  सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता (Gaurav Mehta) यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्रिवेदी यांनी ऐकवलेल्या ऑडिओमध्ये केवळ सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येत आहे. ‘तुम्ही सर्व बिटकॉईन (Bitcoin Scam) काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा. ‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत.’

अजित पवार काय म्हणाले?

बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. आता ते विरोधात आहेत. तसेच मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल. अजित पवार यांची ही प्रतिक्रिया बारामतीमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.