Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

163
Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात (Thackeray vs Rane) उतरले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Nilesh Rane)

आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी दरम्यान जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे यांनी देखील फोनवरुन कार्यकर्त्यांना समजावले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही करायचे ते करा गोळ्या घाला हालणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असंही नारायण राणेंनी सांगितले. (Thackeray vs Rane)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय डायवर्ट करायचा आहे. 15 मिनिटात राणे समर्थक खाली गेले नाहीत तर आम्ही शिवसैनिकांची ताकद दाखवणार, असा इशारा देत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले. शिवसैनिक म्हणून 15 मिनिटानंतर आदित्य ठाकरे यांचा आदेश देखील ऐकणार नाही, असं वैभव नाईकांनी (Vaibhav NAik) सांगितले. 15 मिनिटात ते खाली गेले नाहीत तर शिवसेना देखील रस्त्यावरची संघटना आहे, असं वैभव नाईक म्हणाले. (Thackeray vs Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.