Sushant Singh Rajput Death Case : काँग्रेसने आदित्य ठाकरे यांच्या जखमेवरील खपली काढली

264
Sushant Singh Rajput Death Case : काँग्रेसने आदित्य ठाकरे यांच्या जखमेवरील खपली काढली

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला (Sushant Singh Rajput Death Case) चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे? असा प्रश्न करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उबाठाचे आदित्य ठाकरे यांच्या भळभळत्या जखमेवरील खपली काढली.

नितेश राणे यांच्याकडून पाठपुरावा

सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput Death Case) मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत असल्याने उबाठा या मुद्द्यावर भाष्य करणे टाकताना दिसते. त्यामुळे उबाठाच्या अडचणींचा शांत झालेला मुद्दा पुन्हा उकरून काढून एकप्रकारे उबाठाला काँग्रेसच्या सावंत यांनी डिवचले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अचानक दुर्लक्षित असलेला हा मुद्दा काँग्रेसने नजरेत आणून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Bangladesh Protests : Sheikh Hasina यांची पुढची योजना काय? सर्वपक्षीय बैठकीत S. Jaishankar यांनी सांगितले…)

सावंत यांचे निवेदन प्रसिद्धीसाठी

सावंत यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडली. “भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला परंतु तपासाला चार वर्षे झाली तरी सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे,” असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे. (Sushant Singh Rajput Death Case)

सीबीआय तोंड कधी उघडणार?

सावंत यांनी आणखी पुढे जाऊन, “सुशांतसिंह प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे, अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली आहे. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येस (Sushant Singh Rajput Death Case) आज, मंगळवारी १४६० दिवस झाले, पण सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.