व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नरेटिव्ह अभ्यासक्रमात Supriya Sule चा प्रवेश; राजू वाघमारे यांचा पलटवार

129
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नरेटिव्ह अभ्यासक्रमात Supriya Sule चा प्रवेश; राजू वाघमारे यांचा पलटवार
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नरेटिव्ह अभ्यासक्रमात Supriya Sule चा प्रवेश; राजू वाघमारे यांचा पलटवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत कोट्यवधी महिलांना पैसे मिळाले असून महायुती सरकारने शब्द पाळला. मात्र यामुळे विरोधकांमध्ये पोटशूळ उठला आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोटे नरेटिव्ह अभ्यासक्रमात शिकणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून योजनेच्या अपप्रचाराचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व सह मुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(हेही वाचा- Eco Friendly Ganpati : इकोफ्रेंडली ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करा; नवी मुंबई आयुक्तांचे आवाहन)

राज्यातील एक कोटी महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. या योजनेवर सामना वृत्तपत्र आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थीनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून खोटे नरेटिव्ह पसरवले जात आहेत, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. या योजनेवर विरोधक जे जे खोटं नरेटिव्ह पसरवतील त्यासमोर महायुती सत्यबाजू ताकदीनं जनतेसमोर मांडेल, असेही डॉ. वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी स्पष्ट केले.

डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, एका न्यूज चॅनलच्या एआय आधारित सर्व्हेमध्ये महायुती सरकारच्या कामगिरीवर ६५ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. ७० टक्के लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने चांगले काम केले आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर ६० टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. ५६ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे असा कौल दिला आहे. दुसऱ्या एका सर्व्हेत ३७ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावेत, असे मत व्यक्त केले आहे. दोन वर्षात मुख्यमंत्र्यांची कामगिरीला लोकांनी पसंती दिल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले. (Supriya Sule)

(हेही वाचा- Mumbai Local : दंड मागितल्याने टीसीला मारहाण; विरार एसी लोकलमधील घटना)

संविधावर संकट टळलेले नाही या खोट्या नरेटिव्हला ” संविधानाचा खोटा बागुलबुवा, महाराष्ट्रात जो खरा बागुलबुवा आहे तो उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे ” असा टोला डॉ राजू वाघमारेंनी (Dr. Raju Waghmare) संविधानाच्या मुद्द्यावर लगावला. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी सुरु असलेले खेचाखेची पाहता ‘मला मुख्यमंत्री करा’ असा सिनेमा काढून त्यात प्रमुख भूमिका उबाठाला देण्यात यावी अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसवायचे नाही, हा निर्धार केला आहे. बहिणींना, भावांना, ज्येष्ठांना महायुती सरकारने दिलेल्या योजनांबाबत खोटंनाटं सांगून त्यांना परावृत्त करण्याचा निर्धार मविआच्या मेळाव्यात केला का? असा सवाल डॉ. वाघमारे यांनी यावेळी केला. (Supriya Sule)

उबाठा मुख्यमंत्रीपदासाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून होते. त्यांची ही लाचारी पाहता त्यांना महायुती सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही, असे डॉ. वाघमारे यांनी ठणकावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वाभिमानाने बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले. (Supriya Sule)

(हेही वाचा- Calcutta Doctor Case : डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा; IMA ची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी)

मविआच्या मेळाव्यात उबाठाची पराभूत मानसिकता दिसून आली. उबाठाला कळून चुकलेले आहे त्यांचे आमदार निवडून येणार नाहीत, म्हणून त्यांनी ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नाकारला. शरद पवार आणि कॉंग्रेसने उबाठाच्या मुख्यमंत्रीपदाला यापूर्वीच विरोध केला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत लालसा असलेल्या महाविकास आघाडीला जनतेच्या प्रश्नांचे काही घेणंदेणं नाही, अशी खरमरीत टीका डॉ. वाघमारे यांनी केली. (Supriya Sule)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.