Ajit Pawar : दिवाळीनंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा; सुनील तटकरे यांची माहिती

यातून उद्याच्या कालावधीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बळकट संघटन उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

20
Ajit Pawar : दिवाळीनंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा; सुनील तटकरे यांची माहिती
Ajit Pawar : दिवाळीनंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा; सुनील तटकरे यांची माहिती

राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवाळी नंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी (२८ ऑक्टोबर) दिली. यातून उद्याच्या कालावधीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बळकट संघटन उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar)

राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध ३० आघाडीच्या प्रमुखांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तटकरे यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याची माहिती दिली. आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी तसेच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar)

(हेही वाचा – SP vs Congress : सपाच्या वोटबॅंकेवर काँग्रेसची वक्रदृष्टी; अखिलेश यादव राहुल गांधीवर नाराज?)

आमचे दौरे लवकरच सुरू होतील. संघटना मजबूत करण्यासाठी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध सेलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष करून महिला आणि युवकांचे काम अत्यंत उत्तम पध्दतीने सुरू असल्याचे तटकरे म्हणाले. (Ajit Pawar)

संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मनात काय सुरू आहे आणि ते कोणत्या मानसिक अवस्थेत पोचले आहेत तसेच पुढची पाऊले कोणती उचलावी लागतील याबाबतची सविस्तर चर्चा संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याशी केली होती. दादांना हात जोडून पुढे काय करायचे, अशी विनंती ते करत होते. त्यामुळे अशा संजय राऊतांना अजित पवारांवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात तटकरे यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.