Nana Patole : नाना पटोले यांची दिल्लीत पत काय?; सुनील तटकरेंनी डिवचले

31
Nana Patole : नाना पटोले यांची दिल्लीत पत काय?; सुनील तटकरेंनी डिवचले
Nana Patole : नाना पटोले यांची दिल्लीत पत काय?; सुनील तटकरेंनी डिवचले

नाना पटोले यांची दिल्लीत पत काय आहे, हे पहिल्यांदा त्यांनी सांगावे आणि मग अजित पवारांची बोलती आणि दादांचा तोरा याबद्दल बोलावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पटोलेंना डिवचले. (Nana Patole)

प्रदेश कार्यालयात आले असता सुनील तटकरे यांना पत्रकारांनी अजित पवार यांच्यावर नाना पटोले यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न केला. त्यावर त्यांनी पटोलेंचा कडक शब्दांत खरपूस समाचार घेतला. तटकरे म्हणाले, सध्या नाना पटोलेंची बोलती वाढली आहे. नानांच्या बोलतीमुळे महाराष्ट्रात काय काय घडले, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून राजकारणात उलथापालथ झाली. (Nana Patole)

(हेही वाचा – Nobel Prize Physics 2023: ऑगस्टिनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार, इलेक्ट्रॉनच्या अभ्यासासाठी सन्मान)

अजित पवारांची काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. तिघांच्या कार्यपद्धतीच्या शैली जरी वेगवेगळ्या असल्या, तरी त्या तिघांची एनडीए मजबूत करण्याची दिशा एकच आहे. त्यामुळे संभ्रम असण्याचे कारण नाही. मात्र त्यामुळे धास्तावलेली काही माणसे नको ते कारण शोधत वेगवेगळे शब्दप्रयोग करत आहेत, असेही तटकरे म्हणाले. (Nana Patole)

दिल्लीत आपला तोरा किती आहे, राज्यात किती आहे, आपल्या पक्षातील नेते आपल्याला किती मानतात, हे नाना पटोले यांनी आधी सांगावे, मग इतरांवर बोलावे, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी पटोलेंना डिवचले. (Nana Patole)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.