मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही

176
मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई प्रतिनिधी:
Eknath Shinde : मुंबई शहरातील धोकादायक, जुनी आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी सरकार ठोस पावले उचलणार आहे. पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन हा प्रक्रिया गतीमान केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. (Eknath Shinde)
विधानसभा सदस्य अमिन पटेल (Amin Patel) यांनी मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात (Redevelopment of old buildings) लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने एखादी इमारत धोकादायक घोषित केल्यास प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते.
पुनर्विकास प्रक्रियेची स्पष्ट दिशा
  • जर इमारत मालकाने ६ महिन्यांच्या आत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला नाही, तर भोगवटादार किंवा भाडेकरूच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला संधी दिली जाते.
  • त्यांनीही ६ महिन्यांत प्रस्ताव सादर केला नाही, तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्याची तरतूद आहे.
  • आतापर्यंत मंडळाने ८५४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी ६७ मालकांनी पुनर्विकास प्रस्ताव सादर केले आहेत.
  • त्यापैकी ३० प्रकल्पांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले आहे.

    (हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्याला अटक)

नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच
राज्य शासन नवीन गृहनिर्माण धोरण (New Housing Policy) आणत असून, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. रखडलेल्या पुनर्विकासामुळे मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना परत मुंबईत आणणे आणि गृहनिर्माण प्रकल्पांना (Housing projects) वेग देणे हा सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा – विधानसभेत मराठी भाषेवरून वाद; Aaditya Thackeray आणि नितेश राणे आमनेसामने)

विधानसभेत जोरदार चर्चा
या चर्चेत सदस्य पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्र्यांनी केला.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.