Mukhyamantri Vyoshree Yojana: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र

158
Mukhyamantri Vyoshree Yojana: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र
Mukhyamantri Vyoshree Yojana: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Mukhyamantri Vyoshree Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.

(हेही वाचा-Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक! ८ जणांचा मृत्यू)

राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत. (Mukhyamantri Vyoshree Yojana)

(हेही वाचा-Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदीसाठी तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून ३ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. (Mukhyamantri Vyoshree Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.