Sion Koliwada मध्ये विद्यमान आमदारांनी गरब्यात नाचवले गौतमी, शिल्पाला; तर इच्छुक उमेदवार नवदुर्गांच्या सन्मानात

228
Sion Koliwada मध्ये विद्यमान आमदारांनी गरब्यात नाचवले गौतमी, शिल्पाला; तर इच्छुक उमेदवार नवदुर्गांच्या सन्मानात
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शीव (सायन) विधानसभा क्षेत्रातील (Sion Koliwada) विद्यमान आमदार तमिल सेल्वन यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच दुसरीकडे या मतदारसंघात आपली पकड कायम ठेवण्यासाठी सेल्वन यांच्याकडून गरबाचे आयोजन करत गौतमी पाटील आणि सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे डान्स आयोजित केले. मात्र, दुसरीकडे इच्छुक उमेदवार राजेश्री शिरवडकर यांनी नऊ दिवस नऊ नवदुर्गांचा सन्मान करत एक अनोखा प्रयत्न करत मंडळांच्या भेटींवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

New Project 2024 10 11T212823.469

(हेही वाचा – मराठी रंगभूमीसह टॉलिवूड गाजवणारे Actor Sayaji Shinde यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश)

शीव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार तमिल सेल्वन यांना पुन्हा शीव (Sion Koliwada) ऐवजी धारावीतून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, धारावी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: कडे न घेता शिवसेनेला देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे धारावी विधानसभा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असल्याने मागील काही महिन्यांपासून धारावीची जबाबदारी दिलेल्या आमदार तमिल सेल्वन यांनी या विधानसभेत पुन्हा आपली ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे सेल्वन यांनी अँटॉपहिलमध्ये गरबा रास आयोजित करून सबसे कातिल, गौतमी पाटील यांचा जलवा येथील रहिवाशांना दाखवला. गौतमी पाटील यांचे नृत्य असल्याने अँटॉप हिल परिसरातील लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. तर चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनाही त्यांनी निमंत्रित केले होते. यासह अनेक सेलिब्रेटींना या नऊ दिवसांमध्ये निमंत्रित केल्याने एकप्रकारची गर्दी या गरबात पहायला मिळत होती.

New Project 2024 10 11T212942.500

(हेही वाचा – SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान)

मात्र, दुसरीकडे इच्छुक उमेदवार राजेश्री शिरवडकर यांनी नऊ दिवस नऊ नवदुर्गांचा सन्मान प्रत्यक्ष भेट देत करण्यावर भर दिला आहे. पहिल्या माळेला तृतीयपंथी मंदिरात दर्शन येथील येथील सेवा करणाऱ्या तृतीयपंथीयाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यानंतर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा सन्मान, मरु आई मंदिर माटुंगा मंदिर, पोलिस महिला शिपाई, सत्संग महिला भजनी मंडळ, बौद्ध समाज महिला, दिव्यांग महिला, बचत गट महिला, वाल्मिकी समाज महिला, घरगुती खाणावळ चालवणाऱ्या महिला अशा प्रकारे नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान करत प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत देवींच्या दर्शनावर भर देताना दिसत आहे. त्यामुळे गरबात गर्दी वाढवण्यासाठी विद्यमान आमदार यांनी गौतमी पाटील यांना नाचवले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी ही गर्दी फायदेशी ठरते की नवदुर्गांचा सन्मान कामाला येते हे येत्या काळात उमेदवारीवरून स्पष्ट होईल. (Sion Koliwada)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.