सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री, तर शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

36
सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री, तर शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री, तर शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी, २० मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय, अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर झाला. १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने १३५, भाजप ६६ आणि जेडीएसने १९ जागा जिंकल्या आहेत.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील कोंडी अनेक दिवस सुरुच होती. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी नकार द्यायला धजावत नव्हते. अखेर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी तयार केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे एकमत होऊन शनिवारी नव्या सरकारचा शपथविधी झाला. यावेळी जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

(हेही वाचा – …तर मी राजीनामा द्यायला तयार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ मंत्र्याला प्रतिआव्हान)

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अभिनेते कमल हसन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिले. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना वगळण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.