नागालॅंडमध्ये 50 खोके ओके झाले का? गुलाबराव पाटलांचा खोचक टोला

87

नागालॅंडमधील एनडीपीपी-भाजप आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस भाजपला जाऊन मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुनच आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाीय अधिवेशनात शिंदे गटाचे आमदाक गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

50 खोके ओके झाले वाटते

राष्ट्रवादीने नागालॅंडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने आता तिथे 50 खोके एकदम ओके झाले का? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. बदलाचे वारे एकदम कसे वाहायला लागले. आता 50 खोके नागालॅंड ओके असे म्हणा, असे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला सुनावले.

( हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांचे पहिले बजेट; पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्पाचे वाचन )

मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

गुलाबराव पाटील यांनी विषय काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना घेरले. तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता, आपण जेव्हा दुस-याकडे बोटे दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे उरलेली बोटे असतात, हे लक्षात ठेवा. तसेच, आपलं ठेवलायचं झाकून आणि दुस-याचं बघायचं वाकून, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पवार साहेब बोलतात त्यावेळेस नेहमी उलटे होते, हे सर्वांना माहिती आहे. कसबा हरली तरी भाजपने तीन राज्ये जिंकली, हे विसरलात काय? तुमचे घर हे काचेचे आहे, आमच्यावर दगड मारताना विचार करावा, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.