Shivsena Hearing in SC : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; विधानसभेच्या तोंडावर राजकीय भूकंप होणार ?

Shivsena Hearing in SC : 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती. ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे.

163
Shivsena Hearing in SC : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; विधानसभेच्या तोंडावर राजकीय भूकंप होणार ?
Shivsena Hearing in SC : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; विधानसभेच्या तोंडावर राजकीय भूकंप होणार ?

सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उबाठाच्या गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती. ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. (Shivsena Hearing in SC)

(हेही वाचा – Harassment : पत्नीच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडून गेला; पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला…)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकाल येणार ?

शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. शिवसेनेचे प्रबळ नेते म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसरा पक्ष स्थापन केला. त्यांनी मुंबईहून सूरतमार्गे थेट गुवाहाटी गाठली. त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदारही होते. त्यानंतर शिवसेनेच्या सत्तासंघर्षाला सुरुवात झालेली. अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचले आहे. पक्ष आणि चिन्हाचा निकाल आला, ते शिंदेंच्या स्वाधीन करण्यात आले. पण, याच निर्णयाविरोधात उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणावरील सुनावणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेच्या सत्तासंघर्षाविषयीची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. (Shivsena Hearing in SC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.