Shivadi Assembly Constituency : सुधीर साळवी यांना पक्षात घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न

174
Shivadi Assembly Constituency : सुधीर साळवी यांना पक्षात घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न
  • खास प्रतिनिधी 

शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठामध्ये विद्यमान आमदार अजय चौधरी आणि उबाठाचे शिवडी समन्वयक सुधीर साळवी यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाच शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाकडून साळवी यांना आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Shivadi Assembly Constituency)

(हेही वाचा – गणेशोत्सवात जे हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारकच; Bombay High Court ने निकाली काढली याचिका)

दांडगा जनसंपर्क

सुधीर साळवी हे उबाठाचे शिवडी विधानसभा समन्वयक असले तरी प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे ते मानद सचिव आहेत. तसेच त्यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याचे बोलले जात आहे. साळवी यांना पक्षात घेत अजय चौधरी यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणुकीला उभे करण्याचे प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून होत असल्याचे समजते.

या गणेशोत्सव दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लालबागच्या राजाला दहा दिवसांत दोन वेळा भेट दिली. एकदा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासोबत तर दुसऱ्यांदा १६ सप्टेंबरला आपल्या कुटुंबियांसह मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं. (Shivadi Assembly Constituency)

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?)

निवडून येण्याइतकी मते कुठे मिळतील?

साळवी हे जरी विभागात प्रसिद्ध असले आणि त्यांचा जनसंपर्क चांगला असला तरी त्यांना निवडणुकीत एक उमेदवार म्हणून सर्वसामान्य मतदार कितपत स्वीकारेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हेदेखील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असले तरी त्यांना विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याइतकी मते कुठे मिळतील, हा जसा प्रश्न आहे. तसे साळवी यांना सर्वसामान्य जनता स्वीकारेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. (Shivadi Assembly Constituency)

(हेही वाचा – Matka King Suresh Bhagat Murder Case : महिला पोलिसांना धक्काबुकी केल्याप्रकरणी आरोपी मांडवीकरला अटक)

.. तर तिरंगी लढत

दुसरे असे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून माजी आमदार बाळा नांदगावकर यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे साळवी यांच्या शिवसेना उमेदवारीमुळे या मतदारसंघात अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर विरुद्ध सुधीर साळवी अशी लढत होईल आणि नांदगावकर-साळवी यांच्या मतविभागणीचा फायदा कदाचित चौधरी यांना मिळून, ते विजयांची हॅट्रिक करू शकतात. गेल्या दोन्ही २०१४ आणि २०१९ मध्ये चौधरी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. (Shivadi Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.