Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग

208
Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग
Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटाच्या ‘X’ पेजवर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो आणि ‘हात लावीन तिथे सत्यानाश, हीच मोदींची गॅरंटी!’ असा संदेश असलेली पोस्ट टाकली आणि त्यांच्यावरच बूमरँग झाले.

बंदरामुळे विविध फायदे

वाढवण सुमारे ७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात शुक्रवारी ३० ऑगस्टला करण्यात आले. या बंदरामुळे विविध फायदे होणार असल्याची यादीच मोदी (Narendra Modi) यांनी जनतेसमोर मांडली.

‘पक्ष आणि चिन्ह गेल्यावर रडत बसलाय’

यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो आणि उपरोधिक टीका, उबाठाच्या पेजवरून करण्यात आली आणि त्याला जनतेकडूनच प्रत्युत्तर देण्यात आले. ठाकरे यांचे मोदी यांच्यापुढे नतमस्तक झालेले काही फोटो नेटकऱ्यांनी ‘पोस्ट’ला उत्तर म्हणून टाकले आणि जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या. ‘मोदी पंतप्रधान नसते तर राहुलकडून आपला भारत हा बांग्लादेश, श्रीलंका सारखा झाला असता’ अशी टिप्पणी एकाने केली. तर एकाने ‘मोदी यांच्यासोबत १० वर्षे युतीत’ असल्याची आठवण करून देत ‘आता पक्ष आणि चिन्ह गेल्यावर रडत बसलाय’ असा टोला हाणला.

(हेही वाचा – Dadar Hawker : हप्ता वाढला, फेरीवाल्यांवरील कारवाई बंद)

आमदारकी पण मोदींमुळेच

एका नेटकऱ्याने ‘आमदारकी पण मोदींमुळेच मिळाली’ हे सत्य उघड केलं तर एकाने ‘तोंड उघडीन तिथे टोमणा’ आणि एकाने ‘तू घरात बसून फक्त कोमट पाणी पित रहा’ असा टोमणा ठाकरेंना मारला.

‘हात दाखवून अवलक्षण’

एकाने कार्टून पोस्ट केले आहे, ज्यामध्ये एका दरवाज्यावर ‘नो अॅडमिशन विदआउट पर्मिशन, दिल्ली हाय कमांड’ असे लिहिले होते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दरवाज्याकडे बघत, वेटिंग रूममध्ये एका खुर्चीत वाट पहात बसले आहेत. अशाप्रकारे एकनाअनेक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त करत ठाकरे यांनाच ट्रोल (troll) केले ‘हात दाखवून अवलक्षण’ अशी स्थिति उबाठाची झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.