काँग्रेसच्या सर्वेमध्ये Shiv Sena UBT तिसऱ्या स्थानावर; याचा नेमका अर्थ काय?

147
काँग्रेसच्या सर्वेमध्ये Shiv Sena UBT तिसऱ्या स्थानावर; याचा नेमका अर्थ काय?
  • प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. त्यातही काँग्रेस अव्वल कामगिरीसह नंबर १ चा पक्ष ठरला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वेक्षण करून आपली निवडणूक तयारी चालवली आहे. या सर्वेक्षणाचा काही भाग वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांना मिळाला असून त्यांनी तो आपापल्या खबऱ्यामार्फत प्रसिद्ध केला आहे.

(हेही वाचा – NDA ला एकत्र ठेवणे भाजपासाठी तारेवरची कसरत)

काँग्रेसने महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणात अर्थातच काँग्रेसलाच पहिले स्थान मिळाले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दुसरे, तर शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) तिसरे स्थान मिळाले आहे. काँग्रेसच्या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० ते ८५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ५५ ते ६० तर उबाठाला ३० ते ३२ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे निष्कर्ष नमूद केले आहे. तर महायुतीमध्ये भाजपाला तब्बल ५० जागांचा फटका बसून भाजपा ६० ते ६२ जागांवर, शिवसेना ३० ते ३२ जागांवर, तर अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त १० जागांवर अडकण्याची शक्यता काँग्रेसच्या सर्वेक्षणाने वर्तवली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत मारली मेख !

अर्थातच महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर येणार हे काँग्रेसच्या सर्वेक्षणात स्पष्ट दाखविले आहे, पण या सर्वेक्षणाची खरी “राजकीय मेख” अशी की, काँग्रेसने उबाठाला तिसरे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उबाठा (Shiv Sena UBT) पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याच्या चंग बांधून बसली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी थेट सोनिया गांधींचे १० जनपथ गाठले होते. दिल्लीत बसून मोठे लॉबिंग केले होते.

(हेही वाचा – Piyush Goyal यांनी ‘ते’ वचन पाळले; गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून…)

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे हाच उद्धव ठाकरेंचा मनसूबा असताना महाविकास आघाडीत जर त्यांचे स्थान पहिले तर सोडाच, दुसरेही उरले नाही आणि ते तिसऱ्यावर घसरले, तर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का?, हा कळीचा सवाल आहे. काँग्रेसने आपल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून उबाठात ही “राजकीय मेख” मारून महाराष्ट्रातला आपला मार्ग निष्कंटक करण्याचा प्रयत्न केला आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.