Shiv Sena UBT कडून Hindu देवतांचा अपमान करणाऱ्या महाराव यांच्या वक्तव्याचे समर्थन?

245
Shiv Sena UBT कडून Hindu देवतांचा अपमान करणाऱ्या महाराव यांच्या वक्तव्याचे समर्थन?
  • खास प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी प्रखर हिंदुत्व अंगिकारले. आयोध्येतील बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे वक्तव्य करून समस्त हिंदू जनतेच्या मनात घर केलं. त्यांच्या पश्चात शिवसेना पक्ष फुटला आता शिवसेना उबाठा नावाचा गट राहीला. त्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्री रामांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या तथाकथित पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – हिमाचलमधील Mosques चे अवैध बांधकाम हटवा; महापालिका आयुक्त न्यायालयाचा आदेश)

महारावांच्या शब्दांत

श्रीरामावर अश्लील टीका करणारे वक्तव्य जसेच्या तसे ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) म्हणाले, “रामाचे मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही, तो एक पत्नी होता, आमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावर नाटक आलेली ती पहा तुम्ही, त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं, तर मी तो कोण तीचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय, धोब्याचं ऐकतो, बायकोचं बाळंतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तीचं बाळंतपण होत आणि आपण त्याला देव मानतो, आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे, त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले, पाच शो ‘भुमीकन्या सीता’ नावाचे, ती जी सीता ऑल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे, ती त्या रामाला विचारते, तु स्वतःला इतका मोठा समजतो. राजा समजतो, देव समजतो अजुन कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला तुझी बायको आली, एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती, म्हणून तिच्यावरती तु संशय घेतलास, तु तुझ्या भावाला विचारलस काय? कि १४ वर्षे तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल, ती सांगते अग्निपरिक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेवू नको, माझी शुध्दता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल.’ (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा मनसुबा; पनवेलमध्ये BJP ची तीव्र निदर्शने)

पवार, शाहू महाराज मौन

असे भाषण महाराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत केले. महाराव यांच्या या वक्तव्यावर पवार आणि शाहू महाराज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि मौन बाळगले. भाजपाने महाराव आणि शरद पवार यांच्या विरुद्ध आंदोलन केले. (Shiv Sena UBT)

मुस्लिम मतांची परतफेड हिंदुत्वाचा त्याग करून?

यावर पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे भाजपाचे नेहमीचे धोरण आहे. दंगली घडवायच्या, समाजासमाजात फूट पाडायची, मग दुसरं कुणी काही बोलत असेल तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांना ते वक्तव्य जोडायचे. पण असे कितीही उपक्रम पार पाडले तरी विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे सत्य आहे,” असे सांगून महाराव यांच्यावर प्रतिक्रिया देणे सोयीस्करपणे टाळले. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांनी शिवसेना उबाठाला ‘हात’ दिला आणि उबाठा तरली, त्याची परतफेड हिंदुत्वाचा त्याग करून करणार का? असा सवाल आता हिंदू समाजाकडून विचारला जात आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.