शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार

विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर पदाधिकारी निवडण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने संमत

106
शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी (२३ नोव्हेंबर) मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महाविकास आघाडीला मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव )

शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.