Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक

90
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीकडून 'लाडकी बहीण' योजनेचे कौतुक

Shilpa Shetty Tweet : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाअंतर्गत महिलाच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) कौतुक केले आहे.

(हेही वाचा – ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत नियमांमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात दर महिना १५०० रुपये जमा होणार असे सांगितले होते. ही योजना घोषित झाल्यापासून राज्यातील महिलांमध्ये त्यासाठी अर्ज करण्याची धावपळ सुरू होती. आता अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात १५०० रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) सुद्धा आपले मत एक्स द्वारे व्यक्त केले.


(हेही वाचा – Ind vs Ban, 1st T20 : भारत वि. बांगलादेश पहिला टी-२० सामना धोक्यात? ग्वाल्हेरमध्ये विरोध)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आपल्या एक्स अकाउंट वरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. तिने लिहिले की, राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला आर्थिक हातभार लाभेल. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा महिलांना मिळण्यास आता सुरुवातही झाली आहे याचा मला आनंद वाटतो. राज्य सरकारने हे उचललेले पाऊल म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.