Sharad Pawar यांचा गर्भित इशारा, गृहखात्यावर बोलता येईल; पण राज्यात शांतता…

197

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चांचे आयोजन केले जात आहे. मात्र नाशिकमध्ये आयोजित केलेल्या या मोर्चात मुसलमानांनी हिंसक कृत्य केले. त्यावर बोलताना  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट गर्भित इशारा देत मी गृहमंत्र्यावर बोलू शकतो, पण राज्यात आपल्याला शांतता, सौदार्ह हवे आहे, असे म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, बांगलादेशातील घटनांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहे. बांगलादेशात जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील, असे कधी वाटले नव्हते. अशा परिस्थितीत समाजात एकवाक्यता आणि समंजस्य निर्माण होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. शासनाची कामगिरी, शासनाची कार्यवाही आणि गृहखात्याची कामगिरी यावरही बोलता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचे महत्त्व जास्त वाटते, असे पवार यांनी म्हटले.
बांगलादेशात राजकीय अराजकता माजल्यानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र काही लोकांनी बंदला विरोध दर्शवित दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन गटात वाद झाले. दोन गट समोरासमोर आल्याने भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.