पवार, ठाकरेंचा दुटप्पीपणा; फडणवीसांवर वोट जिहादला विरोध करतात म्हणून टीका; पण Sajjad Nomani वर मौन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभांमधून Sajjad Nomani यांचा वोट जिहादचे आवाहन करणारा व्हिडीओ ऐकवून दाखवणे सुरु केले आणि बटेंगे तो कटेंगे असा नारा देत आहेत. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका सुरु केली.

99

लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मशीद आणि दर्ग्यातून काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांना मतदान करा आणि भाजपाप्रणित रालोआतील पक्षांच्या उमेदवारांना पाडा, असे आवाहन मुसलमानांना करण्यात आले होते. त्यानुसार मुसलमानांनी एकगठ्ठा मते इंडी आघाडीला दिली. म्हणून मग नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत भाजपाने  ‘बटेंगे तो कटेंगे; असा नारा दिला. त्यामुळे हरियाणा हिंदूंनी भाजपाचे सरकार आणले. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रमुख Sajjad Nomani यांनी केंद्रात भाजपाचे सरकार पाडायचे असेल तर मुसलमानांनी महाराष्ट्रात भाजपाला हरवले पाहिजे. वोट जिहाद केला पाहिजे. या वोट जिहादचे शिपाई शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आहेत, असे म्हटले आहेत. त्या Sajjad Nomani यांच्यावर मौन बाळगत पवार आणि ठाकरे हे फडणवीसांना ते वोट जिहादचा विरोध करत असल्यामुळे टीका करत आहेत. हा त्यांचा दुट्टपीपणा उघड झाला आहे.

(हेही वाचा Uddhav Thackerayच्या नेतृत्वात सरकार येणार म्हणत राऊतांनी ‘मविआ’त टाकली वादाची ठिणगी)

काय आहे नेमके प्रकरण?  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभांमधून Sajjad Nomani यांचा वोट जिहादचे आवाहन करणारा व्हिडीओ ऐकवून दाखवणे सुरु केले आणि बटेंगे तो कटेंगे असा नारा देत आहेत. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका सुरु केली. फडणवीस हे वोट जिहादचा बनाव करत महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करत आहेत, अशी टीका करत आहेत. मात्र त्याच वेळी Sajjad Nomani यांनी मुसलमानांना वोट जिहादचे आवाहन करताना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे याचे शिपाई आहेत, असे म्हटले. मात्र याचे ना शरद पवार हे खंडण करत आहेत किंवा ना उद्धव ठाकरे करत आहेत. यावरून या दोघांना Sajjad Nomani यांच्या म्हणणे मान्य आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वोट जिहादचे शिपाई आहे, यावर ते संमत आहेत, हे अधोरेखित होत आहेत. एका बाजूला फडणवीस हे वोट जिहादच्या विरोधात बोलत आहेत आणि बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देत आहेत, यामुळे राज्यात जातीय तणाव निर्माण होत आहे, अशी टीका पवार आणि ठाकरे करत असताना दुसरीकडे भाजपाविरोधात मतदान करा आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी मविआच्या पक्षांना मते देत वोट जिहाद करा असे आवाहन करत धर्मा-धर्मात तेढ निर्माण तेढ निर्माण करणाऱ्या Sajjad Nomani यांना ते अप्रत्यक्ष समर्थन देत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.