महाविकास आघाडी टिकणार का? शरद पवारांचे धक्कादायक उत्तर 

राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी गठीत करण्याच्या मागणीविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हणाले.

265
शरद पवार

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बऱ्याच चर्चा राज्याच्या राजकारणात ऐकिवात येत आहेत. त्याला कारणही एनसीपीतील नेतेमंडळी. आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी लवकरच राज्यात आणि दिल्ली राजकीय भूकंप होणार आहे, असे वक्तव्य केले होते, त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीतील आमदारांचा गट घेऊन भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली आणि आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडी टिकणार की नाही, यावर धक्कादायक विधान केले.

राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महात्मा फुले अग्रीक्लचर फोरमच्यावतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे,आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ, असे पवार म्हणाले.

(हेही वाचा Exclusive# अजित पवार केवळ मोहरा; खरी फूट कॉंग्रेसमध्ये पडणार!)

राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी गठीत करण्याच्या मागणीविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हणाले, जेपीसी हे सोल्युशन नाही. जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे. त्यामुळे या समितीचा काय निर्णय येईल, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून जेपीसी नव्हे तर त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील, ही भूमिका मांडली. तरीही सहकारी पक्षांनी जेसीपीची मागणी केल्यास त्यांच्याबरोबरच असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.