Sharad Pawar यांची सुप्रीम कोर्टात धाव! निवडणुकांपूर्वी केली ‘ही’ मोठी विनंती

158
Sharad Pawar यांची सुप्रीम कोर्टात धाव! निवडणुकांपूर्वी केली 'ही' मोठी विनंती
Sharad Pawar यांची सुप्रीम कोर्टात धाव! निवडणुकांपूर्वी केली 'ही' मोठी विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या, अशी विनंती केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.

(हेही वाचा-Mumbai Local: मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! रविवारी मध्य-हार्बरवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवरही १० तास ब्लॉक)

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) 12 आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं.

(हेही वाचा-Cyber attack : हॅकर्सची नजर सुप्रीम कोर्टावरही; पाकिस्तान नाही तर या देशाचा सायबर हल्ल्यात सर्वात मोठा हात)

सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार (Sharad Pawar) गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. दरम्यान पवारांच्या विनंतीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल, याकडे लक्ष असेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.