V. Senthil Balaji यांना तामिळनाडू सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद, मनी लॉड्रिंग प्रकरणात केली होती तुरुंगवारी

V. Senthil Balaji यांना तामिळनाडू सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद, मनी लॉड्रिंग प्रकरणात केली होती तुरुंगवारी

83
V. Senthil Balaji यांना तामिळनाडू सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद, मनी लॉड्रिंग प्रकरणात केली होती तुरुंगवारी
V. Senthil Balaji यांना तामिळनाडू सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद, मनी लॉड्रिंग प्रकरणात केली होती तुरुंगवारी

तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात जून २०२३ मध्ये अटक केलेल्या व्ही. सेंथिल ( V. Senthil Balaji) यांना तामिळनाडू सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळात फेरबदलाची घोषणा केली आहे. यासंदर्भातील त्यांच्या शिफारशीवरून राज्यपाल आर. एन. रवी यांनी फेरबदलाची अधिसूचना जारी केली आहे. तरी अधिसूचनेनुसार दि.२९ सप्टेंबर रोजी नवनिर्वाचित मंत्र्याचा शपथविधी पार पडला.

ईडीने सेंथिल यांच्यावर कारवाई का केली?

तत्कालीन तामिळनाडू सरकारमधील ऊर्जा मंत्री असणारे सेंथिल २०११ ते २०१५ या कालावधीत अण्णा द्रमुक पक्षाच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. २०१४ साली राज्य परिवहन महामंडळात चालक, वाहक, कनिष्ठ अभियंता आणि सहायक अभियंता या पदासाठी जाहिरात निघालेल्या होत्या. मात्र या जागा भरताना झालेल्या नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाला. ज्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सेंथिल बालाजी ( V. Senthil Balaji) यांचा सहभाग होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यासंदर्भात पीडितांनी तक्रारी केल्या होत्या. ज्यामुळे वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जमीन ही देण्यात आला. मात्र आता त्यांना एम के स्टॅलिन (M K Stalin) यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद दिलेले आहे.

हेही वाचा : Mumbai University Senate Election : भाजपाने केला युवा सेनेचा विजय मोठा; मग गुलाल उधळणारच ना !)

हिंदूद्वेषी Udhayanidhi Stalin यांना त्यांच्या वडिलांनी दिले बक्षीस

दरम्यान स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. तसेच डॉ. गोवी चेझियान , आर राजेंद्रन आणि एसएम नस्सर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. स्टॅलिन पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही महिन्यांपूर्वी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशभरात उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात निदर्शने, आंदोलने सुरु झाली होती. हिंदू संघटनांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आता त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पसरलेला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.